Websites

संस्कृती महाराष्ट्राची

'संस्कृती महाराष्ट्राची ' हा फक्त ब्लॉग नसून ,हा माझ्या तसेच प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा जिव्हाळ्याचा असणारा विषय तुमच्यासोबत सामावून घेताना खूप आनंद होतोय....
तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियांचे अन् सूचनांचे कायम स्वागत आहे.....

मी मूळची महाराष्ट्रीयन असल्यामुळे जरी सध्या सगळीकडे विदेशी गोष्टीचा ट्रेंड असला तरीही मला आपल्याच गोष्टी आवडतात,आणि त्याचं आकर्षण ही जास्त आहे. त्यामुळे सहसा तुम्हाला ब्लॉगमध्ये पारंपरिक भारतीय गोष्टीबद्दल माहिती,रेसिपीज ....संस्कृती आढळेल.
लहानपणापासून मी बघत आलीय आई,काकू,आजी ज्या खूप निगुतीने ,आनंदाने अन् उत्साहाने आपल्या परंपरा जपत आल्या आहेत.नवीन गोष्टी आत्मसात करताना ही आपली संस्कृती पद्धती ठामपणे रोवत आहेत.आणि आज तर वैज्ञानिकदृष्ट्या ही आपल्या पारंपरिक गोष्टी अगदी योग्य आहेत ,हे दिसून येत आहे.....
प्रत्येक ठिकाणचं एक वैशिष्ट्य असत जसं की,महाराष्ट्र म्हटलं की पुरण पोळीला तोडच नाही...लावणी म्हणजे महाराष्ट्र ...अश्याच खूपशा गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून ओळख करून देणारे आहे.